डोंबिवली \ शंकर जाधव : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवानेते आदित्य ठाकरे यांच्या लोकाभिमुख कार्यशैलीने प्रेरित होऊन डोंबिवलीत सुमारे 100 जणांनी जाहीर प्रवेश केला.कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत प्रवीण साळवी, कैलास सणस, आणि शिबू शेख यांच्यासह सुमारे १५०- २०० पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. आजचा हा प्रवेश म्हणजे ठाकरे कुटुंबियांच्या नेतृत्वावर विश्वास आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग पक्षवाढीला अधिक गती देईल, असा विश्वास दिपेश म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी डोंबिवली पश्चिम शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे, कल्याण जिल्हा संघटक तात्या माने , डोंबिवली शहर सचिव सुरेश परदेशी, संजय पाटील, श्याम चौगुले, चेतन म्हात्रे, महिला आघाडी कल्याण ग्रामीण व डोंबिवली विधानसभा संघटक सुप्रिया चव्हाण, प्रियांका विचारे, युवासेनेचे आदित्य पाटील, युवती सेनेचे रिचा कामतेकर तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी शिवसैनिक महिला आघाडी युवासैनिक उपस्थित होते.