धाराशिवमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार



उस्मानाबाद : ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार यंदा धाराशिवमध्ये रंगणार आहे. १ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर पाच दिवस ही स्पर्धा चालणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने केली आहे. एकूण पाच दिवस ही स्पर्धा चालणार आहे. धाराशिव जिल्ह्याला पहिल्यांदाच या स्पर्धेचा मान मिळाला आहे.

धाराशिव जिल्हा कुस्ती तालीम संघ आणि आदर्श शिक्षक प्रसारक मंडळ या स्पर्धेचे आयोजन करणार आहेत. एकूण पाच दिवस चालणाऱ्या स्पर्धेत जवळपास ९०० खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना स्कॉर्पियो, बुलेट, टॅक्टरसह २ कोटींची बक्षीस दिले जाणार आहे. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ आणि उस्मानाबाद तालीम संघ यांच्यावतीनं या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा पार पडणार आहे.

महाराष्ट्र केसरी २०२३ स्पर्धेचा खिताब पृथ्वीराज पाटीलने जिंकला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने विशाल बनकरला आसमान दाखवत विजेतेपद पटकावले. या सामन्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.महाराष्ट्र केसरी २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना अत्यंत चुरशीचा ठरला होता.


Post a Comment

Previous Post Next Post