नवी मुंबईत सप्ताह तथा महाअधिवेशनचे आयोजन

 


भव्य दिव्य विराट राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद्वागवत कथा ज्ञानयज्ञ वारकरी महाधिवेशनासाठी बैठक पार

डोंबिवली ( शंकर जाधव )  : भव्य दिव्य विराट राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद्वागवत कथा ज्ञानयज्ञ वारकरी महाधिवेशनासाठी रविवारी डोंबिवलीजवळील सांगाव येथील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या आवारात ठाणे जिल्हा नियोजन बैठक पार पडली.या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील वारकरी तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.या बैठकीचे रायगड, ठाणे , नवी मुंबई वारकरी संप्रदायच्या वतीने आयोजन केले होते.या बैठकीत प्रस्तावनेत कार्यक्रमाची रूपरेषा मांडण्यात आली. हा सप्ताह तथा महाअधिवेशन फेेब्रुवारी महिन्यात नवी मुंबई येथील खारघर येथे हा सप्ताह तथा महाअधिवेशन होणार आहे.या महाअधिवेशनाच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी ह.भ.प.संतोष केणे यांची नियुक्ती केल्याचे यावेळी सांगण्यात आले.या बैठकीत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ह.भ.प.केणे यांना श्री विठ्ठल रखुमाईची मूर्ती देण्यात आली.

   या बैठकीत ह.भ.प.धनाजी महाराज ( घोट ) पनवेल, ह.भ.प. पुंडलिक महाराज फडके ( मोह ) पनवेल, ह.भ.प.प्रकाश महाराज म्हात्रे( सोनारपाडा, कल्याण ),ह.भ.प.जयेश महाराज भागवंत ( आंबे , अंबरनाथ ), ह.भ.प.चेतन महाराज ( डोंबिवली ), ह.भ.प.संतोष केणे ( डोंबिवली ), अजय पाटील ( मंगरूळ, अंबरनाथ ),जे.डी. बुवा ( सोनारपाडा), मोहन म्हात्रे ( ओवे, पवनेल), अभिमन्यू म्हात्रे ( वडवली, बदलापूर), बबन महाराज ( सोनारपाडा ),रामचंद्र महाराज मुंढे ( देसाई), हरेश डायरे ( बदलापूर) , हनुमान महाराज ( कोळे ) आदींसह वारकरी संप्रदायिक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी ह.भ.प पुंडलिक महाराज म्हणाले, हा कार्यक्रम भव्यदिव्य आहे.सर्व संत वंशांचे , संस्थेचे प्रमुख अधिवेशनात आमंत्रित करण्यात येणार आहे. या सप्ताहात१ लाख भाविक जमणार, पारायणमध्ये पाच हजार बसणार आहेत.ठाणे, नवी मुंबई, रायगड मधून दोन हजार टाळकरी सहभागी होणार आहे. सप्ताहासाठी सहा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने माहीत असणे आवश्यक असून महाविद्यालयांना संपर्क केला जाणार आहे.यावेळी ह.भ.प.केणे यांनी या सप्तहात तथा महाअधिवेशनात लाखो भाविक येणार असल्याचे सांगितले.



Post a Comment

Previous Post Next Post