दिवा, (आरती मुळीक परब) : संभाजी ब्रिगेड ठाणे महानगरकडून ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी ठाणे महानगर अध्यक्ष शिवश्री. सुजय सावंत, प्रदेश सहसंघटक शिवश्री. सतीश देसाई, विभागीय अध्यक्ष शिवश्री. दत्ता पाटील नाना, ईशान्य मुंबई अध्यक्ष शिवश्री. प्रतिक सकपाळ, ठाणे महानगर कार्याध्यक्ष शिवश्री. दिपेश दळवी, शिवश्री. किशोर सावंत इत्यादी पदाधिकारी होते. या निवेदनात संभाजी ब्रिगेड ठाणे महानगर व ठाणे जिल्हा या घटनेचा तीव्र निषेध करीत असून या घटनेस जबाबदार असणारे संबंधित विभागाचे गृह मंत्री व पोलीस अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे, असे म्हटले आहे. तसेच त्यात संभाजी ब्रिगेडच्या वतीने काही मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या.
1.मराठा समाजाला ५०% च्या आतील टिकणारे ओबीसी आरक्षण मिळावे,
2. एस.इ.बी. ई. एस. बी. जी. या प्रक्रियेअंतर्गत सरकारी सेवेत सामावून घ्यावे.
3. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या 15 लाख कर्जाची प्रक्रिया सुटसुटीत करून संबंधित कर्जाच्या ७५% कर्जाची हमी केंद्र शासन व नाबाई यांनी उद्योगांना देण्यासाठी स्थापन केलेल्या ट्रस्ट प्रमाणे सदर कर्जाची हमी शासनाने घ्यावी व विनातारण कर्ज उपलब्ध करुन द्यावे.
4. सारथी या संस्थेची केंद्रे सर्व जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात सुरु करावीत.
5. जालना येथील आंदोलकांवर दाखल करण्यात येत असलेले गुन्हे थांबवून दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत.

