दिवा, ( आरती मुळीक परब) : जालन्यात अंतरवली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठ्यांवर अमानुषपणे मारहाण करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी दिवा शहरातील सकल मराठा समाजाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते दिवा चौकात येऊन घोषणा दिल्या.
दिव्याच्या पूर्वेतील दिवा चौकात येऊन विविध संघटनांतील मराठा एकत्रित सरकार विरोधात निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या. त्यावेळी भारतीय मराठा संघ, सकल मराठा संघ, मराठा उद्योजक पालघर दिव्याची ऍडमिन टीम आणि प्रकाश पाटील, प्रवीण उत्तेकर, रमेश शिंदे, आदित्य कदम, नामदेव पाटील, संभाजी जाधव, नारायण पाटील, कृशिराज चव्हाण, कल्पेश शेलार, संजय पाटील, दिनेश चासकर, राहुल खैर, भरत शिंत्रे, हितेश मोरे, विशाल रावताळे, रवींद्र पाटील, अशोक पाटील इ. उपस्थित होते.
Tags
महाराष्ट्र

