नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी परिवहन मंत्र्यांना वेळ नाही
डोंबिवली ( शंकर जाधव ) : सत्ता स्थापन करून युतीला सहा महिन्यापेक्ष जास्त कालवधीत उलटला.आता छोट्या छोट्या गोष्टीवरून भाजप – शिवसेना ( शिंदे ) गटात नाराजीचे सूर उमटत असल्याचे दिसते. कल्याण येथील उंबार्डे येथील नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारत बनून सहा महिन्याचा काळ उलटला. मात्र अद्याप या कार्यालयाचे उद्घाटन झाले नाही.त्यामुळे भाजपने थेट परिवहन मंत्री एकनाथ शिंदे यांना वेळ नाही का अशा शब्दात पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली आहे.
कल्याण येथील बिर्ला महाविद्यालयजवळील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गैरसोयीचे असल्याने कल्याण येथील उंबार्डेमध्ये नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारती उभी करण्यात आली. आता इमारत तयार पण सहा महिनापासून धूळ खात बसल्याने यावर भाजपने थेट परिवहन मंत्री शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. भाजपा वाहतूक सेल कल्याण जिल्हा अध्यक्ष दत्ता माळेकर यांनी परिवहन मंत्री व परिवहन आयुक्तांना पत्र लिहिले आहे. नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बनविण्यासाठी करोडो रुपये खर्च झाले. पण अजूनही कार्यालय सुरु झाले नाही. या कार्यालयाच्या उद्घाटनाला परिवहन मंत्र्यांना वेळ नाही का ? असा प्रश्न माळेकर यांनी पत्रात म्हटले आहे.
यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सदर इमारती जरी तयार असली तरी त्याला शासनाची परवानगी अद्याप मिळाली नसल्याचे सांगितले. इमारतीतील अनेक कामे बाकी असल्याचेही त्यांनी सांगितले.

