ठाण्यात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

 


ठाणे :  प्रज्ञा फाऊंडेशन आणि बहुजन शक्ती या सामाजिक संस्थेच्या वतीने ठाणे येथील अंबिका नगर येथे प्रज्ञा फाऊंडेशन कार्यालय येथे मराठवाडा मुक्ति संग्राम दिन  साजरा करण्यात आला. यावेळी व्यख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आयटी तज्ञ डॉ अतुल नाईक,जेष्ठ पत्रकार दिलीप सपाटे ,सामाजिक कार्यकर्ते विशाल हिवाळे यांनी उपस्थितांना मराठवाडा मुक्ती संग्राम विषयी माहिती दिली. 

यावेळी रिपाइं नेते प्रल्हाद मगरे, वंचित बहुजनच्या आशाताई शरणागत , प्रज्ञा फाऊंडेशनचे अध्यक्ष तुळशीराम मगरे, बहुजन शक्तीचे बाबासाहेब साबळे, गोरख साबळे, सुशांत साबळे, उमेश जाधव, समाधान सावंत, रवी मोरे आदी उपस्थित होते.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर १३ महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. दरम्यान, १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने आत्मसमर्पण केले. त्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.

Post a Comment

Previous Post Next Post