डोंबिवलीतील बाजारपेठ बांबूच्या मखरांनी सजली

 

डोंबिवली : ज्या सणाची वर्षभर भक्तगण आतुरतेने वाट पाहतात, तो सण म्हणजे गणपती उत्सव. ज्या घरात बाप्पाचे आगमन होणार आहे, त्या घरात मखर बनवण्याची लगबग सुरू झाली आहे. गणपती बाप्पा घरात सूंदर सजावट करून मखरात बसविले जात असल्याने मखरांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर्षी बांबूचे मखर देखील बाजारात उपलब्ध झाले आहे. बांबूच्या मखराची देखील मागणी वाढली असून हे मखर पर्यावरणपूरक आहेत. डोंबिवलीत राहणाऱ्या माधवी पंधरे यांनी हे मखर तयार केले आहेत. 

     पंधरे या दहा ते बारा वर्षांपासून मी असे माखर तयार करतात. त्या म्हणतात, मला कलेची आवड असल्याने मी आणि माझे पती विजयकुमार पंधरे आम्ही दोघांनी मिळून हे मखर बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला काही प्रमाणात घरगुती ऑर्डर यायला सुरुवात झाली. आपण बनविलेले बांबूचे मखर गणेश भक्तांना आवडत आहे अस समजल्यावर आम्ही चार ते पाच मखर विक्री केले. यावर्षी ६० ते ७० प्रकारच्या डिझाईनमधले मखर तयार असून बाप्पाच्या साईजनुसार आम्ही ऑर्डर घेऊन मखर बनवून देतो असे माधवी पंधरे सांगतात. 

    मखर फोल्डेबल असून यामध्ये लाकूड आणि विविध रंगाच्या कापडाचा वापर अधिक केला आहे. नीट फोल्ड करून ठेवल तर दोन ते तीन वेळा हे मखर वापरले जाऊ शकते. लाकडाच्या शीट परराज्यातून मागवतो असेही त्यांनी सांगितले. जेव्हा मखर सगळ्यांना आवडतात हे लक्षात आल्यावर महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांना असे मखर बनविण्याचे प्रशिक्षण दिले. यामुळे विद्यार्थ्यांना चार पैसे मिळतात.



Post a Comment

Previous Post Next Post