महिला मोर्चा अध्यक्षा सपना भगत यांचा आंदोलनाचा इशारा
दिवा (आरती मुळीक परब) : दिवा शहरातील दिवा चौकात (टर्निंग) येथील वाईन शॉप, बिअर शॉपमधून मद्य विकत घेऊन ते दुकानाच्या परिसरात, बाजूच्या मैदानात उभे राहून, एकत्रित बसून मद्यपी सर्रासपने दारू पीत असतात. त्यामुळे तेथून घरी जाणाऱ्या नागरिकांना महिलांना त्याचा त्रास होत आहे. ही महिलांची तक्रार भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षा सपना भगत यांच्याकडे येताच. या समस्येवर त्यांनी लक्ष घालून आक्रमक झाल्या.
दिवा चौकात दोन ते तीन दारुची, बियरची दुकाने आहेत. तेथे बाजूलाच दिवा महोत्सवाचे मोठ्ठे मैदान आहे. दारु पिणारे बेवडे रोज सकाळ संध्याकाळी कामावरुन घरी येताना त्या दारुंच्या दुकानातून दारु घेऊन मैदानात अथवा उभ्याने दारु पिऊन धिंगाणा घालतात. दिवा दारू थोडी जास्त झाली की आपसा - आपसात भांडण, शिवीगाळ हा रोजचा प्रकार तिथे चालू असतो. त्या रत्यावरून नागरिकांना, महिलांना जीव मुठीत घेऊन ये - जा करावी लागते. कित्यके वेळा त्या भागात महिलां सोबत छेड- छाडीचा प्रकार ही घडला आहे. परंतु स्वतःच्या इज्जतीचा विचार करून महिला पोलीस स्टेशन पर्यंत जात नाही, आजूबाजूच्या बिल्डिंग, सोसायटी, मंडळे, संस्था यांची या विरुद्ध वारंवार तक्रार करून पाठपुरावा देखील सुरू असतो. पण आर्थिक साटे लोटे असल्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासन व महानगरपालिकेकडून या विषयावर संपूर्णतः कानाडोळा होत आहे.
या दारूड्यांमुळे एखादा मोठा अतिप्रसंग नागरिकांवर उद्भवल्या वरती तुमचे डोळे उघडतील का ? असा सवाल सौ. सपना भगत यांनी स्थानिक प्रशासनाला आणि पोलीसांना विचारला आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी हे आंदोलन छेडण्यात येईल असे सपना भगत यांनी सांगितले आहे. रस्त्यावरील "बेवडा घटाव दिवा बचाव" असे आंदोलन महिला अध्यक्षांकडून या वेळी पुकारण्यात येणार आहे. येत्या १० दिवसात पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई करून, सदर ठिकाण दारू पिणाऱ्यांपासून मुक्त नाही केले, तर भाजपा महिला मोर्चा तर्फे आमच्या स्टाईलने तिथे आंदोलन करू असे पत्रच काल भाजपा दिवा मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा सपना भगत आणि मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांनी ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वागुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या नेतृत्वात, सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री रवींद्र चव्हाण, मुंब्रा पोलीस स्टेशन मधील वरिष्ठ अधिकारी कोलटकर, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, पोलीस आयुक्तालय ठाणे वरिष्ठ अधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्तालय ठाणे वरिष्ठ अधिकारी, आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदार संघ आमदार निरंजन डावखर यांना देण्यात आले.