कल्याण-डोंबिवलीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ७ नगरसेवकांचा गट अधिकृत



उमेश बोरगावकर गटनेते, संकेश भोईर प्रतोदपदी नियुक्त


कल्याण-डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०२५–२६ मध्ये मशाल चिन्हावर निवडून आलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांचा ७ जणांचा स्वतंत्र गट अधिकृतपणे स्थापन करण्यात आला आहे. यासंदर्भात नगरपालिकेच्या सक्षम अधिकाऱ्यांकडे आवश्यक ती कागदपत्रे सादर करून गटनोंद करण्यात आली आहे.


महानगरपालिका प्रशासनाकडे सादर करण्यात आलेल्या ठरावानुसार, उमेश बोरगावकर यांची गटनेतेपदी, तर संकेश भोईर यांची प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. हा ठराव संबंधित बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला असून, त्याची अधिकृत नोंद प्रशासनाकडून घेण्यात आली आहे.


शिवसेना (उबाठा) पक्षाच्या या गटाच्या स्थापनेमुळे KDMC सभागृहातील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता आहे. शहरातील नागरी प्रश्न, विकासकामे तसेच प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अधिक प्रभावीपणे आवाज उठवण्याची भूमिका हा गट घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post