आयुष्मान भारत योजनेचा लाभ पालिकेच्या रुग्णालयात घेता येईल

 

    पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांचे प्रतिपादन 

डोंबिवली ( शंकर जाधव ) : आयुष्मान भारत योजना ही केंद्र शासनाची योजना असून त्याअंतर्गत कुटुंबाला पाच लाखापर्यंत आरोग्यासाठी सहकार्य मिळते.पालिका हद्दीत नोंदणीकृत दहा रुग्णालये आहेत,ज्यात या योजनेचा लाभ मिळू शकेल असे  कल्याण- डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

कल्याण –डोंबिवली शहरात धूळ प्रदूषण वाढत असून त्यावर पालिका प्रशासनाकडून उपाययोजना सुरु आहेत.शहरात वाहनाची संख्या वाढली असून त्यामुळे शहरातील प्रदूषणात अधिकच वाढ होत आहे. फुटपाथ दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना फुटपाथवरूनही चालणे मुश्कील झाले आहे. यावर उपाय म्हणून मोकळे रस्ते व फुटपाथ असणे आवश्यक असून त्याकरता वाहनांची संख्या कमी होईल. परिणामी शहरातील प्रदूषण कमी होईल.यासाठी पालिका प्रशासन वॉकेबल सिटीसाठी प्रयत्नशील असल्याचे पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

   यावेळी पालिका आयुक्तांनी शहर स्वच्छतेवर बोलताना नागरिकांनी याकरता पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्या पुढे म्हणाले, जे नागरिक ज्यांनी स्वच्छतेच्या नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावरती कारवाई ही झाली पाहिजे. वेळ आली तर स्वच्छतेसाठी नेमलेले स्वच्छता मार्शलवरही कारवाई होईल. शहरात लावत असलेल्या अनधिकृत बॅनरबाबत पत्रकारांनी विचारले असता असे बॅनर उतरवून कारवाई होईल असे आश्वासन देत अधिकृत बॅनर जास्तीत जास्त लागणारी त्याच्या माध्यमातून केडीएमसीच्या तिजोरीत भर पडेल असे सांगितले. रिंगरोड प्रकल्पामधील मधले पॅचेस राहिलेले आहे आता नवीन जीआर आजच आलेला आहे. त्यानुसार आमच्याकडून पेपरवर्क सुरू असून यामध्ये आम्ही प्लॅन करून लाभार्थ्यांना पात्र करून लाभ देण्याचा नियोजन करत आहोत असे आयुक्तांनी यावेळी सांगितले.



  

Post a Comment

Previous Post Next Post