कन्हैया कुमार यांचे मत
नवी दिल्ली : कर्नाटकातील काँग्रेस पक्षाच्या अजेंडाबद्दल बोलताना कन्हैया कुमार यांनी भाजपला पराभूत करण्यासाठी भाजपसारखे होण्याची काँग्रेसला गरज नाही. काँग्रेस सर्व धर्मांच्या कल्याणावर विश्वास ठेवते आणि विशिष्ट धर्माची बाजू घेत नसल्याचे स्पष्ट केले.
"कीचड़ से कीचड़ को साफ नहीं किया जाता है... भाजप को हराने के लिए हमको भाजप जैसा हो जाने की जरुरत नहीं है... असे म्हणत कुमार यांनी भाजपवर निशाना साधला. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाल्याची कबुली देताना कुमार म्हणाले, काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यात काही फरक नाही, पक्षाचे अपयश हे राहुल गांधींचे अपयश आहे.
"काँग्रेसने एक टेम्प्लेट आणला आहे, ज्यामध्ये देशातील लोक कर भरतात आणि त्या बदल्यात सुविधा मिळवतात. मात्र, कालांतराने हा ट्रेंड नाहीसा झाला." "काँग्रेस पक्ष आपल्या जाहीरनाम्यात 'गॅरंटी' आणि 'पर्याय' आणत आहे, राजकारणात बदल घडवून आणत आहे. काँग्रेसचा पराभव झाला असला तरी, अजेंडा अजूनही आमचाच असल्याचे कन्हैया कुमार यांनी सांगितले. "काँग्रेस लोकसभा निवडणुकीतही जिंकू शकते," असे ठाम मत कुमार यांनी व्यक्त केले आहे.
