कल्याणमध्ये स्वच्छता मोहीम



कल्याण:  एक पाऊल स्वच्छतेकडे" या महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांच्या संकल्‍पनेतून महापालिकेच्या दहा ही प्रभागात राबविण्यात आलेल्या आजच्या स्वच्छता मोहिमेत महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, स्वच्छ भारत अभियानाच्या महापालिकेचे ब्रॅन्ड ॲम्बेसिडर डॉ.प्रशांत पाटील, डॉ.रुपींदर कौर इतर सर्व उपायुक्त, इतर अधिकारी, महापालिकेचे माजी पालिका सदस्य, प्रभागांचे सहा.आयुक्त, महापालिकेचा कर्मचारी वर्ग,  महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्र व रुग्णालयातील डॉक्टर्स व कर्मचारी, आय.एम.ए., बँका, हॉटेल व्यवसायिक, हॉस्पिटल्स, क्रेडाई एम.सी.एच.आय. यांचे प्रमुख विकासक व कर्मचारी, महापालिका ठेकेदार व त्यांचे कर्मचारी, जेष्ठ नागरीक संघ, विरंगणा हेल्पिंग हॅन्ड ग्रुप, अंजिरा विकास सामाजिक संस्था, महेश प्रतिष्ठान, श्रीमती चंदामाता सेवा संस्था, वारकरी संप्रदाय मंडळ, समर्थ महिला बचत गट, आई एकविरा मंडळ, कल्याण संस्कृती मंच, श्रमीक मित्र मंडळ, रोटरी क्लब, इतर एन.जी.ओ. इतकेच नव्हे तर, महापालिका शाळांमधील विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी एकदिलाने या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवुन महापालिका क्षेत्रातील सुमारे १३९ कि.मी. रस्त्यांची साफसफाई करुन सुमारे १६८ टन कचरा संकलीत करण्यात आला. 

महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देवून मेट्रो मॉल व एक्सपेरिया मॉलमधील आस्थापनांनी देखील या मोहिमेत सहभाग नोंदविला. त्याचप्रमाणे आजच्या स्वच्छता मोहिमेत रस्ता दुभाजकांची स्वच्छता व टँकरने रस्त्यावरील धुळशमन करण्यात आले. शहरातील विविध संस्था, आस्थापना यांनी आज स्वंयस्फुर्तीने महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेत सहभाग दर्शविल्यामुळे, महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेला आगळे वेगळे महत्व प्राप्त‍ झाले.

Post a Comment

Previous Post Next Post