थंडी पळवणारे लाडू

थंडीच्या काळात पौष्टिक पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे मुलांबरोबरच मोठ्यांनीदेखील या काळात पौष्टिक पदार्थ खाणे गरजेचे असते. यासाठी थंडीत घरोघरी विविध प्रकारचे लाडू तयार होतात. ते लाडू खाल्ल्याने थंडीपासून संरक्षण तर मिळतेच, शिवाय पौष्टीक पदार्थ खाल्ल्याने पोटही भरते. त्यामुळे थंडीत लाडू खावेतच.

डिंकाचे लाडू

डिंकाचे लाडू हाडे मजबूत होण्यासाठी फायदेशीर ठरतात. हे लाडू खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते. डिंक लाडू शरीरातील अशक्तपणा दूर करण्यास मदत करते. हिवाळ्याच्या हंगामात डिंकाचा लाडू खाल्ल्यास सांधेदुखी दुर होते. तसेच सांध्यातील स्नायू मजबूत होतात. डिंकचे लाडू बद्धकोष्ठताअसलेल्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरते.

अळीवाचे लाडू 

अळिवात प्रथिने, लोह, कॅल्शियम, फॉलिक अ‍ॅसिड, 'क' व 'ई' जीवनसत्त्वही आहे. तसेच आयर्न भरपूर प्रमाण असते. ह्याच्या सेवनाने रक्तातील हीमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. तसेच एनिमियाची तक्रार दूर होते. गर्भवती महिलांच्या डिलिव्हरी नंतर अळीवाचे लाडू किंवा खीर खाण्यास दिली जाते.

                                                      मेथीचे लाडू 

कणीक, साखर, तूप, सुकामेवा या पदार्थांबरोबर मेथी घालून मेथीचे लाडू केले जातात. थंडीच्या दिवसात सांध्यांचे विकार, सांध्यांची सूज, स्नायूंच्या वेदना, घशात जंतुसंसर्गामुळे येणारी सूज यावर मेथी उपयुक्त ठरते. थंडीने छातीत कफ जमा होणे, सर्दी होणे, अशा तक्रारींवर मेथी उपयुक्त ठरते. तसेच या दिवसांत लहान मुलांना अशा लाडूंच्या सेवनामुळे त्यांची हाडे बळकट होतात. त्यामुळे हिवाळ्यात हे लाडू खाल्ल्याने फायदाच होतो.

तिळाचा लाडू

तीळ हिवाळ्यात शरीराला आतून गरम ठेवतात व कडाक्याच्या थंडीपासून आपला बचाव करतात. त्यामुळे थंडीच्या दिवसात तिळाचे लाडू आवर्जून खाल्ले जातात.

Post a Comment

Previous Post Next Post