मुंबई इंडियन्सची जबाबदारी हार्दिकच्या खांद्यावर

 


१० वर्षे कर्णधारपद सांभाळणाऱ्या रोहितला डच्चू

मुंबई: आयपीएलच्या नव्या हंगामातील सर्वात मोठी घडामोड म्हणून ज्याकडे पाहिले जात होते, त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. नव्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हार्दिक पंड्याची वर्णी लागली आहे.  

 आयपीएलच्या नव्या हंगामासाठी १९ डिसेंबरला खेळाडूंचा लिलाव होणार आहे. काही दिवसांपूर्वीच हार्दिक पंड्या गुजरात टायटन्समधून मुंबईत इंडियन्समध्ये परतला होता. त्याचवेळी हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवणार याचा कयास लावला जात होता.

रोहित शर्मा २०१३ पासून मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळत होता. गेल्या दहा वर्षात आयपीएलमधल्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक रोहित शर्मा आहे. मुंबई इंडियन्सने निवदेन जारी करत हार्दिक पंड्याच्या नावाची कर्णधारपदी घोषणा केली आहे. यात मुंबई इंडियन्सचा ग्लोबल हेड महेला जयवर्धने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई इंडियन्सला सचिनपासून हरभजनपर्यंत आणि रिकी पासून रोहितपर्यंत नेहमीच असाधारण नेतृत्व लाभले आहे.

 मुंबई इंडियन्सच्या यशात योगदान देण्याबरोबरच या सर्वांनी भविष्यात संघ मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. आता ही जबाबदारी हार्दिक पंड्यावर सोपवण्यात आली असून आयपीएल २०२४ साठी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपद हार्दिक पंड्या सांभाळेल. असे महेला जयवर्धने यांनी या निवेदनात म्हटले आहे.

#hardikpandya #rohitsharma #mumbaiindians #mahelajayvardhne #ipl2024

Post a Comment

Previous Post Next Post