विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना पुरस्कार

 


खासदार श्रीकांत शिंदे यांना अँबेसिडर फॉर सोशल इम्पॅक्ट पुरस्कार 

मुंबई: विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath shinde) आणि केंद्रीय संरक्षण मंत्री (Rajnath Singh) यांच्या हस्ते ‘द सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड २०२३’ ने सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी देखील पुरस्कार देण्यात आवा. खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांना ‘ॲबेसिडर फॉर सोशल इम्पॅक्ट’ हा पुरस्कार देण्यात आला.

समाजासाठी काम करणे हे आपले कर्तव्य व उत्तरदायित्व असून सामाजिक क्षेत्रात नि:स्वार्थ भावनेने अनेक सामाजिक संस्था आणि कंपन्या शासनासमवेत काम करीत आहेत. उत्तरदायित्व सांभाळणाऱ्या संस्थांचे सामाजिक विकासामध्ये असलेले महत्वपूर्ण योगदान ही अभिमानाची व कौतुकास्पद बाब असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

समाज,देश आणि राष्ट्राला प्राधान्य देत  देशात मोठ्याप्रमाणात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था आणि कंपन्या आहेत. शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण आणि बाल कल्याण, पर्यावरण, कृषी, ग्रामीण विकास,आरोग्य आणि स्वच्छता या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वने, आणि मत्स्यव्यवसाय या क्षेत्रात विविध योजना राबवून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. लंडन येथील छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे परत आणण्याचा सामंजस्य करार केला. हजारो झाडांची लागवड करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा निर्णय घेतला त्यांना आज ‘गुड गव्हर्नन्स’ या पुरस्कारानी सन्मानित करण्यात येत आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांना ‘ॲबेसिडर फॉर सोशल इम्पॅक्ट’ हा पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल मला वडील म्हणून अभिमान आहे, असे सांगून दुर्गम भागात आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी सामजिक कार्य करणारे पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले त्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी या सर्व मान्यवरांचे  अभिनंदन केले.

शिक्षण, कौशल्य विकास व प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण, बाल कल्याण, सायबर सुरक्षा, पर्यावरण, कृषी, ग्रामीण विकास, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता, क्रीडा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार श्रीकांत शिंदे, प्रसिद्ध कवी कुमार विश्वास, क्रिकेटपटू युवराज सिंह आणि मिथाली राज, अभिनेत्री भूमी पेडणेकर, माजी केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर, सेवानिवृत्त सनदी अधिकारी डॉ. भास्कर चटर्जी, आयकर आयुक्त विकास अग्रवाल, सहआयुक्त निधी चौधरी, सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव, माजी राज्य निवडणूक आयुक्त जे. एस सहारिया, माजी सनदी अधिकारी दीपक सानन, अजितकुमार जैन, एबीपी माझा मुख्य संपादक राजीव खांडेकर, आयकर विभागाचे आयुक्त सुमित कुमार, एनआरएलएम मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी,  प्रधान मुख्य आयकर आयुक्त रीना झा त्रिपाठी, माजी सनदी अधिकारी डॉ. प्रदीप व्यास, टाटा सामाजिक विज्ञान संस्थांचे प्र-कुलगुरू बिना पॉल, इरा खान, सुहानी शहा या मान्यवरांना गौरविण्यात आले. 



Post a Comment

Previous Post Next Post