Happy Forgings IPO: आयपीओ मार्केटमध्ये हॅप्पी फोर्जिंग दाखल

 

मुंबई: गेल्या महिन्यांपासून आयपीओ मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मंगळवारी मेटल उद्योगातील महत्त्वाची कंपनी असलेल्या हॅप्पी फोर्जिंग (Happy Forgings)लिमिटेडचा १,००८.५९ कोटी रुपयांचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला असून या अंतर्गत कंपनीने ४०० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले आहेत, तर ६०८.५९ कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल असतील.या कंपनीचा आयपीओ १९ ते २१ डिसेंबर २०२३ पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला राहील.

आयपीओसाठी हॅपी फोर्जिंग कंपनीने ८०८-८५० रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केली असून कंपनीने आयपीओमध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी ५०%, रिटेल गुंतवणूकदारांसाठी ३५% आणि उच्च निव्वळ व्यक्तींसाठी १५% हिस्सा राखीव ठेवला जाणार आहे. तर रिटेल गुंतवणूकदार एकाच वेळी १७ शेअर्सचा एक लॉट तर जास्तीत जास्त १३ शेअर्सची बोली लावू शकतील. अशा परिस्थितीत, रिटेल गुंतवणूकदार या आयपीओमध्ये किमान १४,४५० रुपये तर कमाल १,८७,८५० रुपयांची बोली लावण्याची संधी मिळणार आहे. 

या कंपनीचा आयपीओ १९ ते २१ डिसेंबर २०२३ पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला राहील तर २२ डिसेंबर रोजी शेअर्सचे वाटप होऊन आयपीओ अंतर्गत शेअर्स न मिळालेल्या गुंतवणूकदारांना २६ डिसेंबरपर्यंत त्यांचे पैसे परत मिळतील. तर यशस्वी गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात २६ डिसेंबर रोजी शेअर्स जमा होतील. बीएसई आणि एनएसईवर २७ डिसेंबरपासून शेअर्स दिसू लागतील. हॅप्पी फोर्जिंग्सचा आयपीओ आज जीएमपी किंवा आज ग्रे मार्केटमध्ये ४३० रुपये प्रति शेअर प्रीमियमवर आहे. म्हणजेच, कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये इश्यू प्राइसच्या तुलनेत ५०.५९ टक्क्यांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहेत.

जेएम फायनान्शियल, अ‍ॅक्सिस कॅपिटल, इक्विरस कॅपिटल आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायझर्स हे हॅप्पी फोर्जिंग्स आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत, तर लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आयपीओ रजिस्ट्रार आहेत.

१९७९ मध्ये हेवी फोर्जिंग आणि मशीन डिझायन करणारी हॅपी फोर्जिंग कंपनी सुरू करण्यात आली होती. २०२३ च्या आर्थिक वर्षात कंपनीने एकूण २०८.७० कोटी रुपयांचा नफा नोंदवला तर संपूर्ण वर्षात एकूण १,१९७ कोटी रुपयांची कमाई केली. कंपनी या आयपीओद्वारे उभारलेल्या रकमेचा व्यवसायाचा विस्तार, कॉर्पोरेट उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी वापर करणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. आयपीओ खुला होण्याआधीच अँकर गुंतवणूकदारांकडून कंपनीला ३०३ कोटी रुपये मिळाले आहेत. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने अँकर गुंतवणूकदारांना ८५० रुपये प्रति शेअर दरानं ३५,५९,७४० इक्विटी शेअर्सचं वाटप केलं आहे.




Post a Comment

Previous Post Next Post