दोन मुले आणि एका महिला गंभीर जखमी
कल्याण ( शंकर जाधव ) : घरातील वायफाय राऊटरचा स्फोट होऊन दोन मुले व एक महिला गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना कल्याणमधील न्यू गोविंदवाडी परिसरात घडली.जखमी महिलेला नवी मुंबईतील बर्न रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.या घटनेत डोंबिवलीच्या टिळकनगर पोलिसांनी राजू म्हात्रे नावाच्या इंटरनेट ऑपरेटरविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नगमा अन्सारी असे भाजलेल्या महिलेचे नाव आहे. नगमा अन्सारी यांचा तीन महिन्यांचा मुलगा अरमान अन्सारी आणि दहा वर्षीय नजमीन शेख हे दिघे भाजले आहे. दोन्ही मुलांवर कल्याणमधील मीरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जखमी मुलीच्या आई नजमीन शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी मोठा स्फोट झाला, त्यामुळे तीन जण गंभीररीत्या भाजले. आग इंटरनेटची वायर विजेच्या मीटरला लागून होती. नगम यांचे पती अतिक अन्सारी यांनी सांगितले की, विजेच्या मीटरला लागूनच वायफाय इंटरनेट वायर बसवण्यात आली होती. त्यामुळे एवढी मोठी दुर्घटना घडली. पेटीच्या आतून जोरदार ज्वाळा निघत असल्याचेही त्यांनी सांगितले.
