संसदेत वापरलेल्या धुराच्या नळकांड्या कल्याणाती दुकानातून घेतल्या

 

  कल्याण ( शंकर जाधव ) :   संसदेत घुसखोरी करणाऱ्या तरुणाकडे सापडलेल्या रंगीत धुराच्या नळकांड्या सापडल्या. या तरुणाने या नळकांड्या कल्याणातील फटाक्याच्या दुकानातून खरेदी केल्याने त्या दिशेने केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचा तपास सुरू केला आहे.मात्र याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती नसल्याचे सांगण्यात आले. संसदेत घुसखोरी करणाऱ्या तरुणाकडे धुळाची नळकांडी पोलिसांना सापडली. 

संसदेतील धुराच्या नळकांड्याची माहिती हाती येताच कल्याणात फटाक्यांची विक्री करणाऱ्या सर्व विक्रेत्याची पोलिसानी देखील माहिती घेतली. मात्र फटाक्याच्या दुकानात ग्राहकांची नोंद ठेवत नसल्याने या तरुणाने नेमके कोणत्या दुकानातून नळकांडी विकत घेतली याच शोध पोलीस घेत आहेत.केंद्रीय गुप्तचर यंत्रनेचा तपास सुरू असताना व्यापारी मात्र भयभीत झाले आहेत.दुकानदारांची चौकशी सुरू असून यातून पोलिसांच्या हाती धागेदोरे लागतात का हे लवकरच दिसेल.



Post a Comment

Previous Post Next Post