दिवा ( शंकर जाधव ) : बाळासाहेबांच्या भावना काय या प्रश्नावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केलेल्या वक्त्यव्यावर दिव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील शिवसैनिकांनी आंदोलन केले.आमदार गोगावले यांच्या फोटोला ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जोडे मारत आंदोलन केले.शिवसेना ठाकरे गटाचे दिवा शहर प्रमुख सचिन पाटील व दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी दिवा टर्निंग येथे आमदार भरत गोगावले यांच्या फोटोला काळे फासले.
भरत गोगावले यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करत लाखो शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे शिवसेनेचे दिवा शहर प्रमुख सचिन पाटील, शहर संघटक रोहिदास मुंडे,अभिषेक ठाकूर, युवा अधिकारी योगिता नाईक,विधानसभा दिवा शहर संघटिका ज्योती पाटील, शहर संघटिका तेजस पोरजी, उपशहर प्रमुख वैष्णव पाटील, उपशहर प्रमुख प्रियंका सावंत, उपशहर संघटिका चेतन पाटील, विभागप्रमुख मच्छिंद्रनाथ लाड, विभाग प्रमुख अक्षय म्हात्रे, उपशहर अधिकारी स्मिता जाधव, विभाग संघटिका मयुरी पोरजी, विभाग संघटिका गुरुनाथ पाटील, उपविभाग प्रमुख विनय कदम, उपविभाग संघटिका,अजित माने, निलेश चाळके,राज कदम, संजय जाधव, नागेश पवार, गणेश सावंत, अमित गुप्ता, लवकुश अग्रहारी,प्रतीक म्हात्रे, ओकेश म्हात्रे,रोहित भाईजे,चेतन पाटील, अनिरुद्ध तिवारी,अनिल पवार, विकास उत्तेकर,अमितराज गुप्ता, संजय कनोजिया आदी शाखाप्रमुख,उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
