- विद्यार्थी सुखरूप, परवाना नसताना चालवली रिक्षा
- अवैद्य रिक्षा वाहतूकीवर कारवाई होणार
डोंबिवली ( शंकर जाधव ) : विद्यार्थांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाने मोटरसायकलीला धडक देत दुकानात घुसली.या रिक्षातून तीन शालेय विद्यार्थांना शाळेत घेऊन जात असताना हा अपघात घडला. नेहमीप्रमाणे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बुधवारी डोंबिवली पूर्वेकडील गांधीनगर येथून विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत जात असताना हा मानपाडा रोडवरील चार रस्ता येथे हा अपघात घडला.या अपघातात विद्यार्थी सुखरूप असून रिक्षाचालकाकडे परवाना नसल्याचे समोर आले आहे.या रिक्षाचालकावर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली असून आता शहरातील अवैद्य रिक्षा वाहतूक कारवाई मोहीम सुरु होणार आहे.
रमेश बागुल असे रिक्षाचालकाचे नाव असून त्याच्याकडे रिक्षा चालविण्याचा परवाना नसल्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक अजय आफळे यांनी सांगितले. रिक्षाचालवीत असताना ताबा सुटल्याने हा अपघात घडला. सदर ठिकाणी Mho5- dQ1664 रिक्षातील विद्यार्थ्यांना नागरिकांनी सुखरूप बाहेर काढले.येथील जागरूक नागरिक प्रसाद आपटे यांनी याबाबत डोंबिवली रामनगर पोलिसांना माहिती दिली.बेजबाबदार रिक्षाचालकाविरोधात कोणीही तक्रार केली नसल्याचे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. मात्र परवाना नसताना रिक्षा चालविणे,वाहतुकीचे नियम मोडणे अशी कारवाई करत त्याच्यावर ८ हजार रुपये दंड आकरण्यात आला.आपटे म्हणाले, या रिक्षात नेहमी ११ विद्यार्थ्याची वाहतूक केली जाते. हा अपघात होताना मी पहिले असून नागरिकांनी योग्य वेळी रिक्षाला अडविले म्हणून पुढील अपघात टळला.याबाबत वाहतूक पोलीस निरीक्षक आफळे यांना विचारले असता ते म्हणाले, परवाना नसताना रिक्षा चालवणे हे नियमाचे उल्लंघन करणे असून आता वाहतूक पोलीस अवैद्य रिक्षा वाहतूक कारवाई केली.
उपप्रादेशिक परिवहन विभागाची डोंबिवली शहराकडे पाठकल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाने नेहमीच डोंबिवली शहराला पाठ दाखविली आहे. शहरातील अधिकृत रिक्षा थांबे याकरता वर्षातून एकदाचा सर्व्हेच्या नावाने दिखावा केला जातो.परवाना नसताना रिक्षा चालविणे, भाडे नाकारणे, कालबाह्य रिक्षावर कारवाई न करणे यामुळे आता डोंबिवलीकर उपप्रादेशिक परिवहन विभागावर नाराज झाले आहेत. अधिकारी वर्गही डोंबिवलीकडे कानाडोळा करत असून त्यामुळे शहरातील वाहतुकीचे बारा वाजले आहेत.
रिक्षातून १० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची होतेय वाहतूकशालेय विद्यार्थ्यांची रिक्षातून वाहतूक करताना नियमाचे पालन होणे आवश्यक असते. मात्र कोणाचाही वचक नसल्याने काही बेशिस्त रिक्षाचालक १० पेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना दिसतात. यावर एकही रिक्षा युनियन अशा रिक्षा चालकांना जाब विचारण्यासाठी पुढे आले नाहीत.
अपघात घडल्यानंतर वाहतूक पोलिसांना जागवाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांवर कारवाई होताना दिसते. मात्र डोळ्यादेखत १० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची रिक्षातून वाहतूक सुरु असताना देखील वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. एखादा अपघात घडल्यानंतर वाहतूक पोलीस जागे होऊन काही दिवसांपुरते कारवाई करतात.
Tags
महाराष्ट्र
