साईबाबा मंदिर, शिवमंदिराची भाजप कार्यकर्त्यांकडून स्वच्छता

 

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मिशन अयोध्या' मोहिमेअंतर्गत आपल्या परिसरातील सर्व मंदिरांची स्वच्छता करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार भाजप ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष संजय वाघुले यांनी ठाण्यातील दोन मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविले.  ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने वर्तकनगर येथील साईबाबा मंदिर व मासुंदा तलावातील शिव मंदिराची सोमवारी स्वच्छता करण्यात आली. या अभियानात माजी खासदार संजीव नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 वर्तकनगर येथील साईबाबा मंदिर व मासुंदा तलावातील प्राचीन शिव मंदिरात कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली. देशभरात मंदिर स्वच्छता अभियान २१ जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार असून, ठाणे शहरातील विविध भागातील मंदिरांची भाजपाच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता करावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केले आहे.

 या कार्यात माजी खासदार संजीव नाईक, संजय वाघुले यांच्याबरोबरच माजी नगरसेवक मुकेश मोकाशी, संजय रानडे, सागर भदे, सचिन आळशी, धनंजय सिंह, युवा मोर्चाचे सरचिटणीस प्रशांत कळंबटे, सुशांत फाटक , मनोज शुक्ला, कामगार मोर्चाचे अध्यक्ष राकेश चौघुले, समाधान साळवी, नौपाडा मंडल महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघुले, वैशाली विधाते, सई करूळकर, शिल्पा उतेकर, रंजना भंडारे, प्रिया ढवळे, भक्ती मोहिते, एकनाथ ताजने, गणेश खोपडे, भगवान आडे, दीपक कदम, संतोष पांडे, सुजित उपाध्याय, राकेश कतीरा (ठक्कर), संजय सिंह, दीपक पटेल, पराग आशर आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Post a Comment

Previous Post Next Post