सालार’च्या यशानंतर प्रभास नव्या रूपात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. नुकताच आपल्या नवीन राजासाब या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला असून त्यात प्रभास एक वेगळ्याच ढंगात आणि रूपात पहावयास मिळत आहे. ही एक रोमँटिक हॉरर फिल्म असणार असणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन मारुती यांनी केले असून ही पॅन इंडिया फिल्म असणार आहे. मारुती यांनी आतापर्यंत अनेक तेलुगू सिनेमे यशस्वीरित्या दिग्दर्शित केले आहेत. १२ जानेवारी रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. मात्र आता मेकर्सने सिनेमा ९ मे २०२४ साली रिलीज करण्याचे ठरवले आहे. कमल हासन यामध्ये व्हिलनच्या भूमिकेत आहे. यामध्ये अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत असणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना प्रभासच्या हॉरर सिनेमासाठी मे पयर्र्ंतची वाट बघावी लागणार आहे, हे नक्की.
प्रभासने शेअर केलेल्या ’राजासाब’च्या फर्स्ट लूकमध्ये तो टीशर्ट आणि लुंगी अशा अवतारात दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला फटाक्यांचा प्रकाश आहे. ’या सणासुदीच्या मुहुर्तावर राजासाबचा फर्स्ट लूक शेअर करत आहे. सर्वांना मकर संक्रांती आणि पोंगलच्या शुभेच्छा देणारा ठरत आहे.
फिल्मबद्दल दिग्दर्शक मारुती दसारी म्हणाले,’माझ्या आतापर्यंतच्या सिनेमांमध्ये ही सर्वात खास फिल्म असून एक फिल्म निर्माता म्हणून प्रभास आणि मीडिया फॅक्ट्रीसोबत काम करणे माझ्यासाठी सम्मान आणि रोमांचक असा अनुभव असल्याचे मारुती यांनी म्हटले आहे. आम्ही प्रेक्षकांना एक भव्य हॉरर अनुभवाचे दर्शन घडविण्यासाठी तयार आहोत. प्रभास या सिनेमाचा भाग असणे हे जास्त स्पेशल आहे. या भीतीदायक सिनेमात प्रभासचा स्क्रीन प्रेझेन्स आणखी रोमांचित करणारा असेल.’
प्रभास सध्या ’सालार’ चे यश एन्जॉय करत आहे. ’साहो’,’राधेश्याम’ आणि ’आदिपुरुष’ हे तीनही चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्याने ’सालार’ ही ब्लॉकबस्टर हिट दिली. शिवाय त्याचा ’कल्कि २९८९ एडी’ हा रिलीज होणार आहे.

