डोंबिवली ( शंकर जाधव ) : भरत भोईर नगर परिसरातील श्री साई सेवा मंडळाने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पहिल्यांदाच तयार करण्यात आलेल्या "दिनदर्शिका २०२४" चे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्य हस्ते करण्यात आले.
अरुणोदय सोसायटी चिनार मैदान येथे पार पडलेल्या प्रकाशनाच्या वेळी माजी महापौर विनिता राणे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम मान्यवरांसह मंडळाचे अध्यक्ष मंगेश परब आदी पदाधिकारी उपस्थित होते. ह्या दिनदर्शिकाचे सर्वत्र वाटप मोफत केले जाईल असे या दिनदर्शिकेसाठी अथक मेहनत घेणारे मंडळाचे खजिनदार अवि मानकर यांनी सांगितले.
