जेट एअरवेजचे (jet airways) मालक नरेश गोयल यांची न्यायालयात हात जोडून विनंती
मुंबई: एकेकाळी करोडोंचा मालक असलेले नरेश गोयल (naresh goyal) आज मरणाची भीक मागत आहेत. ५३८ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी मुंबई विशेष न्यायालयात हजर झालेले नरेश गोयल भावूक होऊन न्यायाधीशांसमोर रडू लागले. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांनी रडत आपल्या भावना न्यायालयासमोर व्यक्त केली. न्यायाधीशांसमोर हात जोडून गोयल म्हणाले की, मी आयुष्याची प्रत्येक आशा गमावली आहे, जगण्यापेक्षा तुरुंगातच मरण यावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
जेट एअरवेज विमान कंपनीचे संस्थापक नरेश गोयल ५३८ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात अडकले आहेत. या प्रकरणी ईडीने त्याला १ सप्टेंबर २०२३ रोजी अटक केली होती. अटक झाल्यापासून तो मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत. ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करत त्यांना न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती, तेव्हापासून ते न्यायालयात आहेत.
न्यायालयीन सुनावणीच्या वेळेत गोयल न्यायाधीशांसमोर हात जोडून बोलत असताना त्यांचे संपूर्ण शरीर थरथरत होते. मला सुनावणीसाठी न बोलावण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली. नरेश गोयल यांनी त्यांची तब्येत खराब असल्याचे सांगत मी खूप अशक्त झालो आहे आणि मला उभे राहणेही कठीण झाले आहे. आर्थर रोड जेल ते जेजे हॉस्पिटलपर्यंतचा मुक्काम माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक असल्याचे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर मला हॉस्पिटलमध्ये पाठवण्याऐवजी तुरुंगातच मरू द्या, अशी भावना न्यायालयासमोर व्यक्त केली. नरेश गोयल यांची प्रकृती लक्षात घेऊन त्यांच्या प्रकृतीची पूर्ण काळजी घेतली जाईल, असे आश्वासन न्यायालयाने दिले.
शनिवारी ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी गोयल यांची जामिनावर सुटका व्हावी यासाठी अर्ज सादर करत गोयल यांची शारीरिक आणि मानसिक स्थिती “खरोखर ठीक नसून त्यांची काळजी घेण्याची गरज असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नीने १९९३ मध्ये जेट एअरवेजची स्थापना केली, परंतु २०१९ मध्ये कर्ज न भरल्यामुळे एप्रिल २०१९ मध्ये जेट एअरवेजची सेवा बंद करण्यात आली. फोर्ब्सच्या मते, २०१२ पर्यंत नरेश गोयल यांची संपत्ती $१.९ अब्ज होती. ते भारतातील १६ व्या सर्वात श्रीमंत व्यक्ती होते, परंतु एका चुकीने सर्व काही उद्ध्वस्त केले.
.jpeg)