आसाममध्ये २२ जानेवारी रोजी ड्राय डे

 


आसाम : येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. याच दिवशी मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या दिवसासाठी समस्त देशवासींमध्ये उत्साह आहे.या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचे वातावरण असून भाजपशासित राज्यांतील सरकारे वेगवेगळ्या घोषणा करत आहेत. आसाम सरकारने मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत २२ जानेवारी रोजी ड्राय डे जाहीर करण्याच्या निर्णयाला शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

 रविवारी येथे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना पर्यटन मंत्री जयंत मल्ला बरुआ म्हणाले, “आसाम सरकारने राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्त २२ ​​जानेवारी हा दिवस ‘ड्राय डे’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला.

 अयोध्येतील सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, एनडीए शासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्री आणि ६ हजारहून अधिक लोक उपस्थित राहणार आहेत. वाराणसीचे पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित २२ जानेवारी रोजी राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याचे मुख्य विधी पार पाडतील. १४ जानेवारी ते २२ जानेवारीपर्यंत अयोध्येत अमृत महाउत्सव साजरा केला जाईल. विरोधी पक्षनेते सोहळ्यात येवो अथवा न येवो, मंदिराची भव्यता कमी होणार नाही. आम्ही आमंत्रण मिळण्यासाठी आसुसलो आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला आमंत्रण मिळत असेल तर तुम्ही तिथे गेले पाहिजे, असे सरमा म्हणाले.

राम मंदिराचा उद्घाटन सोहळा संस्मरणीय करण्याची संपूर्ण तयारी भाजप व भाजपशासित सरकारांनी केली आहे. त्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. वेगवेगळ्या मागण्या केल्या जात आहे. महाराष्ट्रात एका आमदाराने २२ जानेवारी रोजी मांस विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्याबाबत महाराष्ट्र सरकारने काहीही निर्णय घेतला नसला तरी आसाममध्ये दारूबंदीची घोषणा करण्यात आली आहे. 

अयोध्येतील सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, एनडीए शासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्री आणि ६,००० हून अधिक मह्त्त्वपूर्ण लोक उपस्थित राहणार आहेत.

तर मिसिंग, राभा हासोंग आणि तिवा समुदायांसाठी तीन विकास परिषदांचे आर्थिक आणि प्रशासकीय अधिकार वाढवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला. “आम्ही या परिषदांसाठी अधिक निधी मिळवण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवू,” असे बरुआ म्हणाले आहेत.

याशिवाय बचत गटांतर्गत नोंदणीकृत महिलांसाठी विद्यमान योजनेंतर्गत सरकारने आर्थिक पॅकेज मंजूर केले आहे. मंत्री म्हणाले, “उद्योजक महिलांना त्यांच्या उपक्रमांसाठी ही मदत होईल. सुमारे ४९ लाख महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.”

छत्तीसगढमध्येही ड्राय डे

गेल्या आठवड्यात, छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णु देव सहाय यांनीही २२ जानेवारी रोजी ड्राय डे घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आमच्या सरकारने २२ जानेवारी रोजी ड्राय डे घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण त्या दिवशी अयोध्येत राम मंदिरात अभिषेक होणार आहे,’ असे सहाय यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post