ज्योती CNC ऑटोमेशनचा IPO आजपासून बाजारात

मुंबई: नवीन वर्ष सुरू झाले आहे. इक्विटी मार्केटमध्ये दिवसेंदिवस मोठ्या हालचाली होत आहेत. त्याचबरोबर नवीन तसेच जून्या कंपन्या आयपीओच्या माध्यमातून शेअर्स बाजारात उतरत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये चढाओढ होत असल्याचे पहावयास मिळत आहे. २०२४ नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गुजरातची मेटल कटिंग कॉम्प्युटर न्युमरिकल कंट्रोल (CNC) मशिन्सची निर्मिती  करणारी ज्योती CNC ऑटोमेशनचा IPO आजपासून ९ जानेवारीपासून गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे.  ९ जानेवारीला उघडल्यानंतर कंपनीचा आयपीओ ११ जानेवारीला बंद होईल. कंपनीने IPO साठी प्रति शेअर ३१५-३३१ रुपये किंमत निश्चित केला आहे. विशेष म्हणजे, ज्योती सीएनसी ऑटोमेशन आयपीओ हा २०२४ सालचा पहिला आयपीओ असेल जो स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच BSE आणि NSE वर लिस्ट केला जाईल.

ज्योती CNC ऑटोमेशन लिमिटेड IPO च्या इतर कालावधीबद्दल बोलताना, जारी केलेल्या समभागांचे वाटप १२ जानेवारी रोजी केले जाईल. जर कोणत्याही गुंतवणूकदाराला समभाग न मिळाल्यास त्याचा परतावा  १५ जानेवारीपासून देण्यात येईल. यामध्ये, कमीत कमी १ लॉट साइजमध्ये ४५ शेअर्स असतील ज्यासाठी रु.१४,८९५ गुंतवणुकीची आवश्यकता असेल, तसेच किरकोळ श्रेणीमध्ये, जास्तीत जास्त १३ लॉट साइजमधील ५८५ शेअर्ससाठी रु. १,९३,६३५ ची गुंतवणूक करता येईल. लहान HNI, रु. १४ ची किमान गुंतवणूक मोठ्या HNI ला ६३० शेअर्सच्या किमान लॉटसाठी रु. २,०८,५३० आणि ६८ लॉटमध्ये किमान ३,०६० शेअर्ससाठी रु. १०,१२,८६० गुंतवता येतील.

या IPO च्या इश्यूची एकूण रक्कम रु. १,००० कोटी आहे. या IPO पैकी सुमारे ५०% पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी, ३५% किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित १५% गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे.

ज्योती CNC ऑटोमेशन लिमिटेड कंपनीचा भारतातील तिसरा सर्वात मोठा बाजार हिस्सा सुमारे १०% आहे. ३,००० हून अधिक ग्राहकांसह, त्यांचे ग्राहक केवळ भारतातच नाही तर आशिया, युरोप, उत्तर अमेरिका आणि जगाच्या इतर भागातही पसरलेले आहेत. १ एप्रिल २००४ पासून, त्यांनी जागतिक स्तरावर ३०,००० हून अधिक CNC मशीन्सचा पुरवठा केला आहे.




 



Post a Comment

Previous Post Next Post