प्रॉपटायगर डॉटकॉमचा नवीन अहवाल
४.१० लाख सदनिकांची विक्री
२०१३ नंतर निवासी विक्री सर्वोच्च स्तरावर
मुंबई : देशातील आघाडीची ऑनलाइन रिअल इस्टेट ब्रोकरेज कंपनी प्रॉपटायगर डॉटकॉमच्या नवीन अहवालानुसार भारतातील निवासी रिअल इस्टेट विक्री २०१३ मध्ये सर्वोच्च होती, ज्यामध्ये कॅलेंडर वर्ष २०२३ दरम्यान वार्षिक ३३ टक्क्यांची वाढ झाली आहे आणि एकूण ४.१० लाख सदनिकांची विक्री झाली आहे.
आघाडीचा प्रॉपटेक प्लॅटफॉर्म हाऊसिंग डॉटकॉमची मालक असलेली आरईए इंडियाचा भाग असलेल्या प्रॉपटायगर डॉटकॉमचा अहवाल 'रिअल इनसाइट रेसिडेन्शियल - ॲन्युअल राऊंड-अप २०२३ (जानेवारी - डिसेंबर) नुसार, भारताने कॅलेंडर वर्ष २०२३ मध्ये मागणी व नवीन पुरवठ्यामध्ये दोन-अंकी वाढीची नोंद केली, तसेच नवीन पुरवठा आतापर्यंतचा सर्वोच्च आहे आणि विक्रीमधील वाढ कायम राहिली आहे.
२०२३ मध्ये एकूण ५,१७,०७१ सदनिका लाँच करण्यात आल्या, ज्यामध्ये २०२२ मधील ४,३१,५१० सदनिकांच्या तुलनेत वार्षिक २० टक्क्यांची वाढ झाली. २०२३ मध्ये नवीन पुरवठ्याच्या संदर्भात मुंबई, पुणे व हैदराबाद अग्रस्थानी राहिले आहेत, जेथे २०२३ मध्ये एकूण नवीन लाँचमध्ये त्यांचा एकत्रित हिस्सा ७० टक्के होता.
आपण २०२४ मधील विकासाच्या नवीन टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत असताना या स्थिरतेने रिअल इस्टेट क्षेत्रासाठी सकारात्मक स्थिती निर्माण केली आहे. या आकडेवारीमध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, दिल्ली-एनसीआर (गुरूग्राम, नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद व फरिदाबाद), एमएमआर (मुंबई, नवी मुंबई व ठाणे) आणि पुणे या अव्वल आठ शहरांसाठी कॅलेंडर वर्षामधील चारही तिमाहींकरिता विक्री आकडेवारींचा समावेश आहे.
हाऊसिंगडॉटकॉम, प्रोपटायगरडॉटकॉम व मकानडॉटकॉमचे ग्रुप सीएफओ विकास वाधवान म्हणाले "वाढते व्याजदर, वाढता इनपुट खर्च आणि जगभरातील अनिश्चिततेदरम्यान घरांच्या वाढत्या किमती अशी सुरूवातीची आव्हाने असताना देखील क्षेत्राने अपवादात्मक स्थिरता दाखवली. महामारीनंतर मागणीमध्ये झालेली वाढ प्रमुख स्रोत ठरली, ज्यामुळे मालमत्ता बाजारपेठेत अनपेक्षित वाढ झाली. भारतीय रिझर्व्ह बँकेने एप्रिल २०२३ मध्ये दरवाढ थांबवण्याच्या घेतलेल्या निर्णयाने ग्राहकांचा गृहखरेदीप्रती आत्मविश्वास वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
वाधवान पुढे म्हणाले, ''ग्राहक भावनेमध्ये सकारात्मक वाढ मध्यम-प्रिमिअम व प्रिमिअम सदनिकांसाठी प्रबळ मागणीला चालना देत आहे. दिल्ली व बेंगळुरूमध्ये नुकतेच सादर करण्यात आलेल्या प्रिमिअम लाँचमधून क्षेत्राची स्थिरता दिसून येते. पण, घरांच्या वाढत्या किमतींमुळे किफायतशीर विभागाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. ही स्थिती पाहता नववर्षातील यश विद्यमान गतीचा फायदा घेण्यावर, तसेच बाजारपेठेतील स्थितीशी जुळून जाण्यावर अवलंबून आहे.''
२०२३ साठी डेटा व इनसाइट्समधून निदर्शनास येते की, वर्षातील चारही तिमाहींमध्ये मागणीत क्रमिक व वार्षिक वाढ झाली आहे. पश्चिम व दक्षिण बाजारपेठा मुंबई, पुणे व हैदराबादमध्ये अधिकतम मागणी दिसण्यात आली, ज्यांचा २०२३ मध्ये एकूण विक्रीत एकत्रित हिस्सा ६७ टक्के होता. हैदराबादनंतर अहमदाबादमध्ये ५१ टक्क्यांची सर्वोच्च वाढ दिसण्यात आली आणि २०२३ मध्ये इतर अव्वल शहरांच्या तुलनेत विक्रीत वार्षिक ४८ टक्क्यांची वाढ दिसण्यात आली.
२०२३ मध्ये निवासी मागणीमध्ये वाढ झाली आणि २०१३ मध्ये दिसण्यात आलेल्या वाढीनंतर सर्वोच्च होती. १ ते ३ कोटी रूपये किंमत असलेल्या सदनिकांचा एकूण मागणीमध्ये २४ टक्क्यांचा सर्वोच्च हिस्सा होता. या किंमत श्रेणीचा हिस्सा २०१९ मध्ये महामारीपूर्वीच्या तिमाहीमधील १५ ते १७ टक्क्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मालमत्तेच्या किमती आणि व्याजदरांमधील वाढीचा गृहखरेदीदरांच्या सकारात्मक भावनेवर परिणाम होण्यासह हा परिणाम अल्पकाळासाठी राहण्याची अपेक्षा असल्यामुळे एकूण ग्राहक दृष्टीकोन सकारात्मक आहे.
