भारताचा निखिल चौधरी बिग बॅशमध्ये चमकला

सिडनी : ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग (Big Bash League) १३ वी खेळवली जात आहे. या लीगमध्ये होबार्ट हरिकेन्सकडून खेळताना निखिल चौधरीने चमकदार कामगिरी केली आहे. निखिल चौधरी फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही आपले कौशल्य दाखवत आहे. निखिल चौधरी (Nikhil chaudhari) हा मूळचा भारताचा आहे. भारतीय संघात संधी न मिळाल्याने तो पंजाब Panjab) सोडून चार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाला गेला होता. त्याचा देसी अंदाज पाहून ऑस्ट्रेलिन (Australian) क्रिकेट चाहते त्याच्या प्रेमात पडले आहेत.

बिग बॅश लीगच्या १७ व्या सामन्यात, मेलबर्न स्टार्सविरुद्धच्या सामन्यात निखिलने १६ चेंडूत ३१ धावा केल्या. त्याने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरीश रौफच्या चेंडूवर षटकारही ठोकला. १ जानेवारी २०२४ रोजी लीगच्या २१ व्या सामन्यात त्याने अप्रतिम गोलंदाजी कौशल्य दाखवले आणि दोन विकेट घेतल्या.

निखिल चौधरीचा जन्म दिल्लीत झाला. २०१६-१७ मध्ये, त्याने पंजाबसाठी देशांतर्गत क्रिकेट आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने पंजाबसाठी दोन लिस्ट ए सामने आणि १६ टी-२० सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर ए श्रेणीतील सामन्यात एक विकेट आणि टी-२० मध्ये नऊ विकेट आहेत. टी-२० मध्येही त्याने १७८ धावा केल्या आहेत. त्याने शेवटचा सामना २७ नोव्हेंबर २०१९ मध्ये मुंबई विरुद्ध पंजाब खेळला. या सामन्यात त्याने पाच धावा केल्या. २०१९ मध्येच, तो क्रिकेट करिअरचा पाठपुरावा करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेला आणि तिथेच स्थायिक झाला.

त्याने सर्वप्रथम ब्रिस्बेनमधील क्लब क्रिकेटपासून सुरुवात केली आणि त्यामुळेच त्याला ओळख मिळाली. टी-२० MAX स्पर्धेत त्याने उपांत्य फेरीच्या सामन्यात २८ चेंडूत ७१ धावांची स्फोटक खेळी केली. या खेळीत त्याने सात षटकार मारले. या मोसमातील या कामगिरीमुळे बिग बॅश लीग संघ होबार्ट हरिकेन्सने त्याला आपल्या संघात समाविष्ट केले. बिग बॅश लीगच्या पहिल्या सामन्यात त्याने ४० धावांची स्फोटक खेळी खेळली होती.



Post a Comment

Previous Post Next Post