आयुक्त तुकाराम मुंढे डोंबिवलीत

डोंबिवली: रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट तर्फे "व्होकेशनल एक्सलन्स (Vocational Excellence) या रोटरी जगतातील मानाच्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन हे शनिवार दिनांक १३ जानेवारी रोजी संध्याकाळी ५.३० वाजे पासून रोटरी भवन, पेंढारकर कॉलेज जवळ, डोंबिवली ईस्ट इथे करण्यात आले आहे.

 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे ( I. A. S.) हे उपस्थित राहणार आहेत. विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या तीन व्यक्तींचा ज्यामध्ये अपूर्वा पालव ( Women's Physique ), निहार केळकर ( Badminton ),  अजित करकरे ( Educationalist ) तसेच सामाजिक आणि विविध कार्यात अग्रेसर असणाऱ्या टिळक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या संस्थेचा रोटरीतर्फे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. 

सदर कार्यक्रम हा सर्वांसाठी खुला असून या कार्यक्रमाला येण्याचे आमंत्रण हे रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीचे रोटेरिअन मानस पिंगळे प्रसिद्धी प्रमुख ( रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट ) यांनी दिले आहे.

 


Post a Comment

Previous Post Next Post