पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना क्रीडा संकुलात मोफत सुविधा

 


आमदार गणपत गायकवाड यांचे प्रयत्न

कल्याण  ( शंकर जाधव ):  डोंबिवलीतील ह.भ.प. सावळाराम क्रीडा संकुलात बॅडमिंटन,कुस्ती,टेबल टेनिस,जलतरण तलाव, अशा विविध खेळांच्या सुविधा पालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात याव्यात जेणेकरून जिल्हा,राज्य,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर  खेळाडू आपल्या देशाचा झेंडा रोवतील. 

पालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट असते.कल्याण डोंबिवली पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा आणि खेळाडू निर्माण व्हावे या उद्देशाने आमदार गणपत गायकवाड यांनी पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांना पत्राद्वारे मागणी करून पाठपुरावा केला होता. 

आमदार गणपत गायकवाड यांच्या प्रयत्नातून पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना क्रीडा संकुलात मोफत सुविधा मिळणार आहे.सुमारे १५० हून अधिक विद्यार्थांना या संधीचा फायदा मिळणार आहे.गरीब विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांबाबत आमदार गणपत गायकवाड यांनी पालिका आयुक्तांचे आभार मानले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post