डोंबिवली ( शंकर जाधव ) : २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी डोंबिवली पश्चिमेकडील कुंभारखानपाडा येथील साधना आधार वृद्ध सेवा केंद्रात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मनसे डोंबिवली शहर अध्यक्षा मंदा पाटील, मनसे महिला पदाधिकारी प्रमिला पाटील, स्मिता भणगे, केंद्राच्या संचालिका सुमेधा थत्ते, डोंबिवली पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रशांत जोशी, खजिनदार सोनल सावंत, सदस्य वासुदेवन मेनन, शंकर जाधव यासह मनसे पदाधिकारी, जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
यावेळी लहान मुलांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले.तर छत्रपती शिवाजी महाराज वेष परिधान केलेला बालक पाहून सर्वांनी कौतुक केले.तसेच पाथरली येथील पालिकेच्या आचार्य भिसे गुरुजी प्राथमिक विद्यालयात मनसे डोंबिवली शहर अध्यक्षा मंदा पाटील यांच्या हस्ते शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.