दिवा, (आरती मुळीक परब) : मनसे साबे शाखा अध्यक्ष, मराठा उद्योजक लॉबी दिवा शहर संघटक, राजे प्रतिष्ठान कामगार सेना ठाणे जिल्हा उपसचिव, सरकार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, समाजसेवक सयाजीराव तुकाराम चव्हाण (सरकार) यांच्या वाढदिवसानिमित्त दिवा येथे महिलांसाठी होम मिनिस्टर, खेळ पैठणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी महाराष्ट्र लावण्यवती सलोनी मुंबईकर यांनी ही कार्यक्रमास भेट देऊन संपूर्ण कार्यक्रम अनुभवला. कार्यक्रम तर भरपूर होतात परंतु त्यातले महिलांसाठी किती होतात याच विचाराने सयाजीराव सरकार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त खास महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमात महिलांना संजीवनी इंटरप्राईजेस राजेश गुरव आणि सयाजीराव सरकार यांच्यामार्फत महिलांसाठी पाच मानाच्या पैठणी व छोटे - मोठे वीस बक्षीसे व कार्यक्रमास उपस्थित प्रत्येक महिलेस हळदी कुंकवाचा मान म्हणून भेटवस्तू देण्यात आले. यावेळी महिलांच्या चेहऱ्यावरती हसू उमटल्याचे दिसून आले. कारण दररोज महिला घर कामात आणि इकडे तिकडे अडकून असतात. त्यातून थोडासा विरंगुळा म्हणून हा सयाजीराव सरकारांनी कार्यक्रम आयोजित केला होता. महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटण्याचे दिसून आले. सर्व महिलांनी सयाजीराव सरकार यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.
सरकार यांची ग्रँड एन्ट्री, सलोनी मुंबईकर यांची एन्ट्री व होम मिनिस्टर फेम नयन निकम यांची अशा ग्राउंड एन्ट्री नंतर औक्षण करून कार्यक्रमाची सुरुवात करून आकर्षक असा मोठा केक सरकारांच्या समर्थकांनी आणला होता. शेवटी सर्व महिलांना नाष्टा व पाण्याची सोय करण्यात आली होती. विविध खेळ आणि प्रश्नमंजुषा नंतर पाच मानाच्या पैठण्या देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..! विशेष म्हणजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डायरेक्टर वैभव पडवळ यांनी केले. यावेळी सर्व महिलावर्ग, मराठा उद्योजक लॉबी टीम, मनसे दिवा साबेगाव टीम, राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य, संकल्प फाउंडेशन, सरकार फाउंडेशन व सर्व हितचिंतक मित्रमंडळी शुभेच्छा देण्यास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन केलेल्या सर्व टीमचे डायरेक्टर वैभव पडवळ, सिद्धेश पडवळ, सागर गावकर, प्रवीण धुरी, जुगल बारिया, मिथिल दुदवडकर, मोहन बारिया, महेश पांचाळ, प्रसाद कांबळे, सुमित नांदिवडेकर यांच्यासह सर्वांचे सयाजीराव सरकार यांनी आभार व्यक्त केले.
