डोंबिवली ( शंकर जाधव ) : मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला डोंबिवलीतील ईगल ब्रिगेड फाऊंडेशन, द फर्गिव्हनेस क्लब, जीवन संवर्धन फाऊंडेशन व प्रणिक हिलिंग परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद दुसऱ्यांदा संवाद कौशल्य शिबिराचे ठाणे येथील जीवन संवर्धन प्रकल्पातील जागेवर आयोजन करण्यात आले. याठिकाणी असलेल्या बेघर मुलींसाठी हे शिबीर पार पडले. या मुलींमध्ये आत्मविश्वासाची वाढ होण्यासाठी व करिअर विषयक मार्गदर्शन संवाद कौशल्य प्रशिक्षक गौरव गुप्ता यांनी केले.
शिबीर संपल्यानंतर या मुलींमध्ये नवीन चेतना बघायला मिळाली. जीवन संवर्धन फाउंडेशनचे अध्यक्ष सदाशिव चव्हाण यांचा सहयोग शिबिरास मिळाला व द फॉरगिव्ह नेस क्लबच्या संस्थापक सुरभी भुतडा यांचे देखील यावेळी सहकार्य लाभले. ईगल ब्रिगेड फाऊंडेशनचे संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांच्या संकल्पनेतून हे शिबीर पार पडले. ईगल ब्रिगेड फाऊंडेशनचे सदस्य पूजा मोरे व नेहा डोईफोडे यांनी देखील या कार्यक्रमात योगदान दिले.
# ईगल ब्रिगेड फाऊंडेशनचे #द फर्गिव्हनेस क्लब

