पालिका मुख्यालयासमोर फेरीवाल्यांचा मोर्चा

 


प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन

कल्याण  ( शंकर जाधव ) :  राष्ट्रीय फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करावी तसेच या कायद्याची अंमलबजावणी करण्यास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करत शुक्रवारी महाराष्ट्र पठारी सुरक्षा दलाच्या नेतृत्वाखाली फेरीवाल्यांनी  महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला होता. केडीएमसी  मुख्यालयाचे प्रवेशद्वारावर शेकडो फेरीवाल्यांनी ठिय्या आंदोलन केले. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मंत्रालयाचे दार ठोठावणार असल्याचा इशारा अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी दिला.

  कल्याण - डोंबिवली स्टेशनबाहेरील १५० मीटरच्या आत बसणाऱ्या फेरीवाल्यांवर पालिकेकडून कारवाई सुरू आहे.फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करा, त्यांचे पुर्नवसन करा त्यानंतर कारवाई करा अशी मागणी करत 

 महाराष्ट्र पथारी सुरक्षा दलाच्या नेतृत्वाखाली शेकडो फेरीवाल्यांनी केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढला.मोर्चेकरांनी पालिकेच्या  मुख्यालयाचे प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी फेरीवाल्यांनी महापालिका प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी महाराष्ट्र पथारी सुरक्षा दलाचे अध्यक्ष वैराट म्हणाले,  राष्ट्रीय फेरीवाला कायद्याचे परिणामकारक अंमलबजावणी करावी, महापालिकेने स्वतंत्र फेरीवाला विभाग सुरू करावा, फेरीवाल्यांच्या बायोमेट्रिक सर्वेक्षण करून त्या फेरीवाल्यांना परवाना द्यावा, राष्ट्रीय शहर फेरीवाला समिती गठित करून प्रत्येक व्यवसायधारकांना विमा, पेन्शन, मुलांना शालेय शिक्षणात सूट सारख्या सुविधा द्याव्यात. फेरीवाल्यांवर कारवाईच्या नावाने मालमत्तेचे नुकसान करणे थांबवा.


Post a Comment

Previous Post Next Post