महापौरांची पाहणी ; १ जूनपर्यंत पुनर्वसनाचे उद्दिष्ट
ठाणे : ठाण्यातील गावदेवी भाजी मंडई येथे गुरुवारी लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर-गायकवाड यांनी आज घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केली. आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गाळेधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी महापालिका प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे.


