तुकाराम मुंढे यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार
डोंबिवली ( शंकर जाधव ) : पूर्वेकडील रोटरी भवन येथे पार पडलेल्या रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट तर्फे 'Vocational Excellence' पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून अधिकारी तुकाराम मुंढे ( I. A. S.) हे उपस्थित होते. विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या तीन व्यक्तींचा ज्यामध्ये अपूर्वा पालव ( महिला शरीर सौष्ठव), निहार केळकर ( बॅडमिंटन ), अजित करकरे ( शैक्षणिक कार्य ) तसेच सामाजिक आणि विविध कार्यात अग्रेसर असणाऱ्या टिळक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ह्या संस्थेचा रोटरी तर्फे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र आणि भेटवस्तू असे ह्या पुरस्काराचे स्वरूप होते. सन्मान नीय प्रमुख पाहुणे तुकाराम मुंढे हे पहिल्यांदाच डोंबिवली मध्ये आले होते आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट या संस्थेच्या कामाची स्तुती त्यांनी मुक्तकंठाने केली.याप्रसंगी तुकाराम मुंढे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने समाजात वावरताना सार्वजनिक भान ठेवून काम करावे असे नमूद केले. प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी असेल की त्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रात काम करत असताना समाजात पण एक भावनेने काम करावे. केवळ फक्त आपल्यासाठी न बघता आणि शासन काही करेल यावर विसंबून न राहता प्रत्येकाने आपल्या कृतीतून समाजात काम केले पाहिजे.

