शिवसेना पक्षातर्फे डाळ- साखरेचे वाटप

 


डोंबिवली ( शंकर जाधव) : अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिरात श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या दिवशी देशातील तमाम लोकांनी दिवाळी सणा सारखाच आनंदोत्सव साजरा करा असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. याच विषयाला अनुसरून कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लोकसभा परीक्षेत्रात अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. प्रत्येक कुटुंबाला या दिवशी घरात गोडधोड करता यावे म्हणून शिवसेना पक्षातर्फे शिंदे यांनी मोफत साखर आणि डाळीचे वाटप केले.

२२ तारखेला अयोध्येला प्रभुश्रीरामचंद्रच्या मूर्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे.यादिवशी सर्वांनी दिवाळी साजरी करावी याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार दहा लाख नागरिकांना शिधा वाटप करण्यात येणार आहे.याची सुरुवात माजी महापौर विनिता राणे यांच्या प्रभागातून ( नेमाडे गल्ली) करण्यात आली.यावेळी खासदार डॉ.शिंदे यांनी नागरिकांना शिधा वाटप केला.

यावेळी माजी महापौर विनिता राणे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम,डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, माजीनगरसेवक विश्वनाथ राणे, शहर सचिव संतोष चव्हाण, विभागप्रमुख अजय पांचाळ, शाखाप्रमुख धनाजी चौधरी,जितेंद्र नाचरे, उपशहरप्रमुख दिनेश शिवलकर, विभागप्रमुख कल्पना कांबळी, शाखासंघटक तन्वी इंगळे, भारती पवार आदींनी उपस्थित होते.तर डोंबिवली पश्चिमेला गोपीनाथ चौक येथेही शिधा वाटप कार्यक्रमात खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी गोरखनाथ ( बाळा ) म्हात्रे, कविता म्हात्रे, अनमोल म्हात्रे, संदीप सामंत, मनोज वैद्य,हरिश्चंद्र पाटील,संदेश पाटील, माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे यांसह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी प्रभागातील महिला-पुरुष हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक कुटुंबाला शिधाकुपन वाटप करण्यात आले होते. अत्यंत नीटनेटके केलेल्या नियोजनामुळे कार्यक्रमात सुटसुटीतपणा होता. 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण लोकसभा परिक्षेत्रात साखर आणि डाळ याचं वाटप खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. शिंदे म्हणाले, येत्या २२ तारखेला आपल्या सगळ्यांच्या ज्या भावना होत्या, आपल्या अनेक पिढ्या ज्याची वाट पाहत होते असं प्रभू श्रीरामांचं मंदीर अयोध्यामध्ये उभं राहतं असून त्याठिकाणी प्रभू श्रीरामची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर आताच संपूर्ण देश राममय झालेला आहे. सगळी लोकं येत्या २२ तारखेची आतुरतेने वाट पहात आहेत. गेली अनेक वर्षे अनेक पिढ्या प्रभू श्रीरामांच मंदिर कधी होईल याची वाट पहात होती. 

तब्बल ५०० वर्ष वाट पाहिल्यानंतर प्रभू श्रीरामांचं मंदिर उभं राहतं असून आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा हा क्षण आहे. यासाठी अनेक हुतात्मे, अनेक बलिदान तसेच अनेकांनी आंदोलने केली त्यानंतर आता मंदिराची उभारणी झाली आहे. भव्यदिव्य मंदिरात आता प्रभू श्रीरामाचं दर्शन घेता येईल. १४ वर्षांच्या वनवासानंतर प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्येत परतले होते तेव्हा दिवाळी साजरी करण्यात आली होती तसाच क्षण पुन्हा येत आहे सगळ्यांनी घराघरात पणत्या पेटवून दिवे लावून रोषणाई करत दिवाळी साजरी करा असे आवाहन केले.




Post a Comment

Previous Post Next Post