डोंबिवली, (शंकर जाधव) : घरफोडी करून पळून जाणाऱ्या आरोपीला डोंबिवली रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकून गजाआड केले. अटक आरोपींकडून १,१०,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकाश सोनु केदारे ( १९ , बेकार यह ज्योतीनगर झोपडपटटी पाण्याच्या टाकीजवळ, आयरेगाव, डोंबिवली पूर्व ) असे अटक आरोपीचे नाव आहे.२३ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आयरेगाव, रुम नं. ७२, ज्योतीनगर झोपडपट्टी, पाण्याच्या टाकीजवळ, डोंबिवली पूर्व येथे फिर्यादी यांचे राहते घरात आकाशने प्रवेश करुन सोन्या चांदीचे दागीने, रोख रक्कम व मोबाईल असा १,१०,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरला.
या प्रकरणी डोंबिवली गुन्हा दाखल करण्यात आला होता.सपोनि सानप, पोहवा वाघ, पोहवा सरनाईक, पो.ना. कोती पोअं पोटे, पोअ सांगळे यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. आकाश हा ज्योतीनगर, आयरेगाव डोंबिवली पूूर्वे येथे आल्याची गुप्त बातमीदाराने माहीती दिल्यावर पोलीस पथकाने आकाशचा आयरेगावमधील ज्योतीनगर झोपडपट्टी पाण्याच्या टाकीजवळ पाठलाग करुन अटक केली पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -३, कल्याण सचिन गुंजाळ सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) खापरे यांचे मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, पोहवा विशाल वाघ, पोहवा प्रशांत सरनाईक, पोलीस नाईक दिलीप कोती, पोअं देवीदास पोटे, पोअ नितीन सांगळे यांनी कामगिरी केली आहे.
