डोंबिवलीत इमारतीला आग

डोंबिवली : डोंबिवलीच्या पलावा इथल्या एका बहुमजली इमारतीला शनिवारी सकाळी आग लागल्याची घटना समोर आली आहे. इमारतीमधील एका घराला आग लागल्यानंतर ती संपूर्ण इमारतीमध्ये पसरत गेली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत आहेत.

शनिवारी दुपारी १३:२३ च्या सुमारास पलावा फेज २, खोणी, डोंबिवली (पू.) येथे टाटा ओरोलिया बिल्डिंगच्या डक्टमध्ये आग लागली होती. ही आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना अथक परिश्रम घ्यावे लागले. सदर आग विझवण्यात एक ते दीड तासाचा अवधी लागला. सदर घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसल्याची माहिती पलावा अग्निशमन केंद्राकडून देण्यात आली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post