शिवसेना उभारणार डोंबिवलीत ३० फुटाचे श्रीराम मंदिर

 


    दहा लाख नागरिकांना साखर व डाळ वाटप 

   डोंबिवली ( शंकर जाधव ) : अयोध्या येथे  २२ जानेवारीला प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून १३ तारखेपासून भव्य कार्यक्रम आयोजित केले आहेत.

१३ ते १९ तारखेपासून नेहरु मैदान येथे भागवत सप्ताह आहेत.कल्याण लोकसभा मतदार संघात प्रभू रामचंद्रचा ३० फुटाचा रथ मिरवणूक काढणार आहे. तसेच दहा लाख नागरिकांना दोन किलो साखर आणि एक किलो डाळचे वाटप करण्यात येणार आहे. 

प्रत्येक प्रभागात २५०० नागरिकांना कुपन दिले जाणार आहे. त२१ व २१ तारखेला क्रीडा संकुल येथे ३० फुटाचे श्रीराम मंदिर उभारले जाणार असून लक्ष दिव्यांनी दीपोत्सव केले जाणार असल्याची माहिती शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी दिली.तसेच प्रत्येक घरात जाऊन शिवसैनिक हे अक्षदा देऊन २२ तारखेला प्रभू श्रीराम मंदिरात दर्शन घ्या असे सांगितले.



Post a Comment

Previous Post Next Post