खासदार राजन विचारे यांनी केलेल्या संघर्षाला यश
ठाणे, : गेल्या आठ महिन्यांपासून तयार झालेले दिघागाव रेल्वे स्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत रखडले होते. हे स्थानक सुरू व्हावे यासाठी शिवसेना नेते, ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी रेल्वेमंत्री व रेल्वे राज्यमंत्री तसेच रेल्वे प्रशासन यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र त्यांना नुसती आश्वासने देण्यात येत होती. नवी मुंबईचे भाजपचे नेते यांनी देखील दिघा गाव रेल्वे स्थानकाचे उद्घाटन लवकरात लवकर व्हावे यासाठी आग्रही होते, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून याबाबत सूचना प्राप्त होत नसल्यामुळे या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन होत नव्हते. अखेर १२ जानेवारीला या स्थानकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार असल्याचे रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांनी पत्राद्वारे खासदार राजन विचारे यांना कळविण्यात आले आहे.
खासदार राजन विचारे यांनी या दिघा गाव रेल्वे स्थानकात स्वाक्षरी मोहीम घेऊन दहा हजार लोकांच्या सह्या घेतलेली कागदपत्रे व नागरिकांच्या प्रतिक्रिया देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच रेल्वेमंत्री व रेल्वे राज्यमंत्री यांना दिले.
नुकताच युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही या स्थानकाला भेट दिली. तयार झालेले दिघागाव रेल्वे स्थानक का सुरू करीत नाही असा जाब सरकारला विचारल्यानंतर १२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्गाच्या उद्घाटनाला येणार होते. परंतु त्यामध्ये दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्याचे निश्चित नव्हते. परंतु ते आता निश्चित झाले असून खासदार राजन विचारे यांना रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांचे पत्र प्राप्त झाले आहे.
नवी मुंबई शहरात नोकरीनिमित्त कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथील नागरिक येत असतात. या रेल्वे प्रवाशांना नवी मुंबईत येण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात येऊन हार्बर मार्गावरील वाशी लोकल पकडावी लागते. त्यामुळे या प्रवाशांचा वेळ ताकद खर्ची पडत असते या प्रवाशांना डायरेक्ट नवी मुंबईमध्ये प्रवेश मिळण्यासाठी हा ऐरोली कळवा एलिव्हेटेड प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे तसेच यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा वाढणारा अतिरिक्त भार ही कमी होणार आहे, त्यामुळे ठाण्यातील प्रवाशांना दिलासा मिळेल.
.jpeg)
.jpg)