महावितरणचा एकीकडे अंधार तर एकीकडे प्रकाश

नागरिकांचे हाल

स्ट्रीट लॅम्प असूनह बंद स्थितीत 

ठाणे : ठाणे शिवाई नगर येथे नुकताच रस्ता कॉंक्रीटीकरणाचे काम झाले असताना येथे महावितरणच्या स्ट्रीट लॅम्प बंद अवस्थेत असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 

    ठाण्यातील सर्वात राजकीय दृष्ट्या बलाढ्य असलेल्या तसेच आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्नी माजी नगरसेविका परिषा सरनाईक यांच्या माध्यमातून पोखरण रोड न.१ येथील शिवाई नगर येथे रस्ता कॉंक्रीटीकरणाचे काम करण्यात आले. मात्र हे काम होत असताना रात्रीच्या वेळेत लाईट नसल्यामुळे अनेक नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. 

येथे महावितरणचा स्ट्रीट लॅम्प असूनही तो बंद अवस्थेत असल्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील रस्त्यावर अनेक स्ट्रीट लॅम्प चालू स्थितीत आहेत मात्र श्री गणेश अपार्टमेंट जवळील स्ट्रीट लॅम्प बंद अवस्थेत आहे. येथील रस्ता मुख्य प्रवेशद्वार असल्यामुळे नागरिकांची येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा परिस्थितीत लाईट नसल्यामुळे महिलांना तसेच मुलांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. 

नुकताच रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने रस्त्यावर पाण्याचा ओलावा मोठ्या प्रमाणात आल्यामुळे दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर नवीन रस्त्यावर पाणी असल्यामुळेच तसेच नुकताच काम झालेले असल्यामुळे येथे गाड्यांची पार्किंग रस्यावर अधिक प्रमाणात होत आहे, त्यामुळेच रात्रीच्या वेळेस आधीच गाड्यांतून वाट काढण्याची कसरत करावी लागते त्यात स्ट्रीट लॅम्प सुरू नसल्यामुळे दुखापत होण्याची शक्यता अधिक आहे. 



Post a Comment

Previous Post Next Post