डोंबिवली ( शंकर जाधव ) : स्टेशनबाहेरील १५० मीटर अंतरात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आहे.या फेरिवाल्यांवर पालिका प्रशासनाकडून कारवाई सुरू असताना फेरीवाल्यांनी पथक प्रमुखास घेराव घातला.मात्र पथक प्रमुखाने पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाई सुरूच राहणार असे सांगितले.
पालिकेचे 'ग' प्रभाग क्षेत्र पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे व कर्मचारी फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना फेरीवाल्यांनी घेराव घालून कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला.मात्र पथक प्रमुखाने कारवाई सुरू ठेवल्याने काही वेळ वातावरण तापले होते.'फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करा त्यानंतर कारवाई करा अशी मागणी फेरीवाल्यांनी यावेळी केली.मात्र पालिका आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड यांनी दिलेल्या आदेशानुसार कारवाई सुरूच राहील असे फेरीवाल्यांना सांगितले.पथक प्रमुखाने कारवाई सुरूच ठेवत स्टेशन बाहेरील १५० मीटर अंतरात बसलेल्या फेरीवाल्यांचा माल जप्त केला.
