कल्याणमध्ये अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर निष्कासनाची धडक कारवाई !

कल्याण: महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांचे निर्देशानुसार ९/आय प्रभागात सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कल्याण (पूर्व) येथील गोळवली, पिसवली या परिसरातील ३ अनधिकृत गाळे बांधकाम, १० शेड्स, ७ टपऱ्या व ३ हातगाड्यांवर निष्कासनाची कारवाई केली. तसेच रस्त्यावरील एकूण ४ बेवारस वाहने जप्त केली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम विभागातील कर्मचारी व फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ जे.सी.बी., १ डंपर, १ हायड्रा व ५ कामगार यांच्या सहाय्याने करण्यात आली.

त्याचप्रमाणे १०/ई प्रभागाचे सहा. आयुक्त भारत पवार यांनी डोंबिवली (पूर्व) आईस फॅक्टरी ते अय्यप्पा मंदिर येथील आठवडा बाजारावर कारवाई केली. यामध्ये २३ शेड्स, ३ टपऱ्या व ५ हातगाड्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली असून, संपूर्ण रस्ता रहदारीसाठी मोकळा करण्यात आला. सदर कारवाई फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी, महापालिका पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ जे.सी. बी., १० कामगार यांच्या सहाय्याने करण्यात आली.



Post a Comment

Previous Post Next Post