देशी बनावटीचे पिस्टल, रिव्हॉल्वरसह तीन जिवंत काडतूसे विकणाऱ्यास अटक

ठाणे, :  मुंब्रा रेल्वे स्थानकाजव एका युवकाकडे एक देशी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह व सहा चेंबरचे रिव्हॉल्वर आढळून आले. त्याचबरोबर त्याच्याकडे देशी बनावटीचे दोन अग्नीशस्त्र व तीन जिवंत काडतुसे सापडल्याने त्याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. त्या युवकाकडून एकूण  ६५,६०० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अजय कुंभार करीत आहेत.

मुंब्रा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुंभार यांना  मुंब्रा रेल्वे स्टेशन जवळील एम.गेट परिसरात एक युवक घातक वस्तू घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सदर ठिकाणी सापळा लावण्यात लावण्यात आला होता. बिहार राज्यातील स्थानिक असलेला राकेश सत्येंद्रकुमार मेहता (वय-१९ वर्षे)  हा तेथे आला असता त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. राकेश मेहताची अंगझडती घातली असता त्याच्याकडे पॅन्टच्या आत लपविलेले एक देशी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह व सहा चेंबरचे रिव्हॉल्वर मिळुन आले तसेच त्याचे पॅटच्या खिशामध्ये देशी बनावटीचे दोन अग्नीशस्त्र व तीन जिवंत काडतुसे असा एकूण ६५,६०० रु. किमतीचा मुद्देमाल सापडला. याप्रकरणी राकेश मेहतावर मुंब्रा पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई महेश पाटील (अप्पर पोलीस आयुक्त) पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे शहर, तसेच गणेश गावडे (पोलीस उप. आयुक्त) परि-१ ठाणे, विजयसिंह भोसले (सहाय्यक पोलीस आयुक्त) कळवा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक - निवृत्ती कोल्हटकर, सपोनि अजय कुंभार, सपोउपनिरी दिपक जाधव, पोलीस अंमलदार अजिज तडवी, सतिश खाबडे, तेजस परब, रोशन कदम, कृष्णा आव्हाड यांनी केलेली असुन पुढील तपास सपोनि अजय कुंभार करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post