कल्याण ( शंकर जाधव) : कल्याणमधील वाहतूक शाखेत साप शिरल्याने गर्दी झाली होती.याची माहिती वॉर फाउंडेशनच्या मदत क्रमांकावर माहिती दिल्यानंतर प्राणी मित्र सतीश बोबडे व प्रेम आहेर पोलीस ठाण्यात आले.
प्राणीमित्रांनी सापाला पकडून वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली निसर्गमुक्त करण्यात येईल असेही सांगितले. साप धामण जातीचा बिनविषारी साप असून त्यापासून मानवाला कोणताही धोका नाही अशी माहिती पोलीस कर्मचारी व नागरिकांना दिली.

