डोंबिवली ( शंकर जाधव ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टी ग्रामीण मंडळाच्या वतीने ४ '५ आणि ६ मार्च रोजी राष्ट्रीय नारी शक्ती समारोह आयोजित करण्यात आला होता. ४ तारखेला भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळ वतीने सायंकाळी चार वाजता व्याख्येथॉन / मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. यावेळी ग्रामीण मंडळातील सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
५ मार्च रोजी सायंकाळी चार वाजता घरडा सर्कल ते स्टार कॉलनी या मार्गांवर महिलांची मोटारसायकल रॅलीची काढण्यात आली होती. आगामी लोकसभा निवडणुकीत ४०० पार करून पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान केल्याशिवाय राहणार नाही असे यावेळी महिलांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता भारतीय जनता पार्टी ग्रामीण मंडळ महिला मोर्चा अध्यक्ष मनिषा राणे व भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष सूर्यकांत माळकर, सर्व ग्रामीण मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
