प्रभाग २७ मध्ये शिवसेनेचा जोरदार जनसंपर्क

 


शैलेश पाटील यांच्या प्रचाराची सूत्रे कैलेश पाटील यांच्या हाती

दिवा \ आरती परब : महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने दिवा परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभाग क्रमांक २७ मध्ये शिवसेनेचे उमेदवार व माजी नगरसेवक शैलेश पाटील यांच्या विजयासाठी त्यांचे भाऊ व शिवसेना उपविभाग प्रमुख कैलेश पाटील यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे.


दोन स्वतंत्र टीम तयार करून मुंब्रा देवी कॉलनी, दत्तनगर आणि दिवा स्टेशन परिसरात घरोघरी जनसंपर्क साधला जात असून शैलेश पाटील यांनी मागील पाच वर्षांत केलेली विकासकामे मतदारांपर्यंत पोहोचवली जात आहेत. शिवसैनिकांचा उत्साह आणि कुटुंबीयांची भक्कम साथ पाहता प्रभाग २७ मध्ये शिवसेनेचा प्रचार अधिक प्रभावी ठरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post