कल्याणमधील २०० महिला वकिलांचा सन्मान

 


  १४ महिला वकिलांना पुरस्कार प्रदान 

डोंबिवली ( शंकर जाधव ) : जागतिक महिला दिनानिमित्त कल्याण जिल्हा न्यायालय वकील संस्थेच्या वतीने २०० महिला वकिलांना न्यायाधीश यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व १४ महिला वकिलांना राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

 कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात पार पडलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त महिला वकिलांचा गौरव करण्यात आला.यावेळी कल्याण जिल्हा न्यायाधीश शिवाजी कचरे, लाभाटे व पठाण, कल्याण जिल्हा न्यायालय फौजदारी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रकाश जगताप, उपाध्यक्ष ॲड.गणेश पाटील, कार्यकरिणी सभासद ॲड.प्रदीप बाविस्कर आदी उपस्थित होते.यावेळी २०० महिला वकिलांना प्रमाणपत्र व १४ महिला वकिलांना राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी मैत्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ॲड.बाविस्कर यांच्यावतीने लकी ड्रॉ विजेत्या महिला वकिलांना बक्षीस व महिला पोलीस, शिपाई व कर्मचारी, वकील यांना पुष्पगुच्छ आणि पेन देण्यात आले. ॲड. गणेश पाटील यांनी महिला वकिलांना लेडीज पाऊच हे गिफ्ट म्हणून दिले. तसेच हळदीकुंकू समारंभ व गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी ॲड. उज्वला पाटील यांनीही राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल त्यांनी संघटनेचे आभार मानले.या कार्यक्रमात सूत्रसंचालनाची जबाबदारी ॲड.क्रांती रोठे यांनी सांभाळली तर अध्यक्ष ॲड.जगताप यांनी आभार मानले.



Post a Comment

Previous Post Next Post